HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मोठ्या मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार, गडकरींचा विश्वास

नागपूर | २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला आहे. गडकरी यांनी सहकुटुंबसोबत आज (११ एप्रिल) नागपूर येथील २२० क्रमाकांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही देशाच्या विकासाचा अजेंडा राबविला आहे. या विकासकामांमुळेच देशातील जनतेचा आम्हाला मोठा पाठिंबा आहे. यामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. तसेच मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा,  लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, आवाहन देखील गडकरींनी मतदान केल्यानंतर नागरिकांना केले आहे.

नागपूरमध्ये भाजपच्या नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा प्रवास करणारे सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या नाना पटोलेंना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. नागपुरातील लोकसभा लढत ही दुरंगी लढत म्हणून बघितली जात आहे.

नागपूर मतदारसंघाची २०१४ सालची स्थिती

सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मतदारसंघाबाबत. नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत विधानसभेचे ६ मतदार संघ आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम, पूर्व, मध्य, पश्चिम, उत्तर, आणि दक्षिण. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी नागपूर येथील उमेदवार होते. भाजपचे नितीन गडकरी, कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार, बसपाचे मोहन गायकवाड, आपच्या अंजली दमानिया त्यापैकी विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ५,८७,७६७ मत मिळून विजय झाला होता. तर विलास मुत्तेमवार यांना ३,०२,९१९ मते मिळाली होती. गडकरी यांनी २,८४,८२८ मतांनी राज्यमंत्री मुत्तेमवर यांचा पराभव केला होता. यावेळी नागपूरमध्ये भाजपला ५४.१६ तर कॉंग्रेसला २७.९३ टक्के मते मिळली होती.

Related posts

करिना काँग्रेस तर माधुरी भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

News Desk

कमल हासन यांना गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल | हिंदू महासभा

News Desk

मोदींचा शपथविधी सोहळा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच !

News Desk