HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…गरीबांच्या घरी जेवण नाय”; ‘मविआ’च्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session Maharashtra) सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा (16 मार्च) बारावा दिवस आहे. अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर महागाईविरोधा आंदोलन करत घोषणाबाजी केली. महाविकास आघाडने चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध केला.

 

या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली.

 

 

Related posts

सरकारचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती; संजय राऊतांनी पुन्हा भाजपला डिवचलं

News Desk

महिलांच्या आनंदावर विरजण, रेल्वे बोर्डाने सांगितले सध्या महिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही

News Desk

टिव्हीच्या नेटवर्क मध्ये राहणाऱ्यांना जनतेचे नेटवर्क काय कळणार? अजितदादा भाजपवर भडकले

News Desk