HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

यंदा शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार !

बारामती | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचे प्रचार ऐन रंगात आले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघाला आम्ही सुरुंग लावणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारसभेत रामदास आठवले बोलत होते.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या कांचन कुल यांचा एकमेकांशी सामना होणार आहे. यावेळी कांचन कुल या प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. एनडीएने २०१४ साली भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन निवडणूक लढविली होती. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही विकासाच्या मुद्दा घेऊन लढत आहे. आमचा विजय नक्की आहे, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, शंंभर टक्के मंत्री होणार !

News Desk

“मोदी स्वतंत्र भारताला मिळालेले सर्वात वाईट पंतप्रधान”

News Desk

कॉग्रेसच देशाचा विकास करू शकते | राहुल गांधी

News Desk