HW News Marathi
मनोरंजन

#IndependenceDay | मी पंतप्रधान नव्हे तर, प्रधानसेवक !

अपर्णा गोतपागर | स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देशाचे पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित केले. मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, ‘मी पंतप्रधान नाही, तर प्रधानसेवक आहे,’ असे म्हणत मोदींनी भाषणाला सुरूवात केली. या भाषणा दरम्यान संसद आदर्श ग्राम योजना, जन धन योजना, सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उभारणी, डिजिटल इंडिया आदी महत्त्वपूर्ण योजना मोदींनी जाहीर केल्या.

देशातील मुलींचा संख्य ही पुरुषांच्या तुलने कमी आहे. स्त्री भ्रुण हत्या देशासाठी लज्जास्पद घटना आहेत. देशाला पुढी नेण्यासाठी विकास हा एकमेव रस्ता आहे. गोरगोरीबांसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना यांच्या माध्यमातून त्यांना बँकेशी जोडले जाणार आहे. प्रत्येक गरीब कुटुंबा १ लाख रुपयाचा विमा दिले आहे. अपघात झाला ना त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना हा पैसे दिले जातील.

मेक-इन इंडियाचा नारा

मेक-इन इंडियााचा नारा देशाकतील उद्योगांना चालना मिळावी यासाठी जागतिक स्तरावरील उद्योजकांनी भारतात येऊन उत्पादन केंद्रे स्थापन करावीत, असे आवाहन मोदी यांना केले. मेकिंग इंडिया आंतर्गत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, औषधनिर्माण, उपग्रह, पाणबुडी आदी क्षेत्रांत गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत

२०१९ पर्यंत देशातील महात्मा गांधी यांची १२५ वर्षाच्या जयंती येणार आहे. या जयंतीच्या साजरी करणआर तेव्हा गाव, शहर, गल्ली, शाळा, मंदिर आणि रुग्णालय आपण सर्वांनी योगदान करून हे स्वच्छ करायला पाहिजे.

मुलींसाठी स्वच्छतागृहे

देशातील महिलांना उघड्यावर शौचालयाला जावे लागते. प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहे नसल्यामुळे मुली शाळा सोडावी लागते. येत्या वर्षभरात मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधली जातील असे पंतप्रधानांनी जाहीर केले.

संसद आदर्श ग्राम योजना

या योजना अंतर्गत प्रत्येक खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करील, अशा पद्धतीची योजना आहे. या योजनेतून दत्तक घेतलेल्या गावांना आदर्श गाव करावे. ही योजना येत्या २०१६ पासून या योजनेची सुरूवात होणार होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

News Desk

चार्ली चॅप्लिनचा नेहरूंसोबत घडलेला हा किस्सा तुम्हाला माहीत आहे का ?

News Desk

ऐतिहासिक ! ‘ठाकरे’ सिनेमाचा पहाटे ४.१५ चा शो हाऊसफुल्ल

News Desk