HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून सुरु होणार

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी,संवाद साधण्यासाठी यात्रांचे आयोजन केले होते. दरम्यान, त्यानंतर गेल्या काही दिवसांत राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या यात्रा काही काळासाठी स्थगित केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली महाजनादेश यात्रा काही काळासाठी स्थगित केली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेचा पुढचा म्हणजेच दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला भेट देतील.

कोल्हापूर आणि सांगली भागात मुसळधार पावसांमुळे निर्माण झालेल्या भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून या भागांतील पाणी जरी ओसरायला सुरुवात झाली असली तरीही पाणी ओसरून गेल्यानंतरचे आव्हान मोठे आहे. या जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांचे आयुष्य पुन्हा पूर्ववत होण्यास अजून बराच कालावधी जाईल. दरम्यान, राज्यातील या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे काही विरोधी पक्षांकडून विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सुरु आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आपल्या यात्रेच्या पुढच्या टप्प्याचा तारखा देखील जाहीर केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्यात उत्तर महाराष्ट्र व मराठवाडयातील एकूण १४ जिल्हे, ५५ विधानसभा मतदारसंघांमधून १८३९ किमीचे अंतर पार करणार आहेत. यात ३९ जाहीर सभा व ५० हुन अधिक स्वागत सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. तर या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सवानंतर सुरु होईल अशीही माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा

Manasi Devkar

राजभवनात ‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित!

News Desk

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार! – हसन मुश्रीफ

Aprna