मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांचा विजयी झाला आहे. सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ अगदी सुरुवातीपासून चर्चेचा विषय राहिला आहे. नाशिकच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. नाशिकच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून सत्यजीत तांबे हे आघाडीवर होते.
नाशिक पदवीधर मतदारसंघात 30 जानेवारी रोजी मतदान झाले. नाशिकमध्ये एकूण 338 मतदान केंद्र होती. दरम्यान नाशिक विभागात 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले. नाशिक विभागात 49.28 टक्के मतदान झाले आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजीत तांबेंना 15 हजार 784 मते मिळाली आहे. तर शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 एवढी मते मिळाली आहेत. तसेच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत सत्यजीत तांबेंना 7 हजार मते मिळाली.
तांबेंनी उदमेवारी अर्ज दाखल केल्यानंतर नेमके काय झाले
या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे चिरंजीव सत्यजीव तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घटनेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. सत्यजीत तांबेंनी पक्षाविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. आता सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या चुरसेची लढत पाहायला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.