HW News Marathi
राजकारण

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ पाहुण्यांना आहे निमंत्रण

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी आज (३० मे) दुसऱ्यांदा आपल्या नव्या मंत्रिमंडळासह संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यात देशातील तसेच परदेशातील जवळपास ८,००० पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पाहुण्यांमध्ये बिमस्टेक समूहातील देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह, अनेक अँबेसेडर्स, डिप्लोमेट, सेलिब्रिटी, १०० हून अधिक एनआरआय आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांचा समावेश असेल. दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक

एकीकडे ममता बॅनर्जी यांनी राजकीय कारण देत पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे नवीन पटनायक हे आज विजयी आमदारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदा ममता बॅनर्जी यांनी आपण नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

“मी तुमचे संविधानिक आमंत्रण स्वीकारले होते. त्यासाठी येण्याची तयारी देखील केली होती. मात्र, गेल्या काही वेळात माध्यमांचे रिपोर्ट्स पाहिले. भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये ५४ राजकीय हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हे चुकीचे आहे. या हत्या राजकीय हेतूने झाल्या नसून त्या परस्परांच्या वादातून, कौटुंबिक भांडण आणि इतर कारणांमुळे झाल्या आहेत. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही”, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला.

२०१४ साली ५००० पाहुणे उपस्थित होते

२०१४ साली राष्ट्रपती भवनातील ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला होता त्याच ठिकाणी यंदाचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. २०१४ साली पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ५,००० हून अधिक जण उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी शपथविधी सोहळ्यासाठी सार्क समूहातील देशांना आमंत्रण दिले होते. यंदा या शपथविधी सोहळ्यात ८,००० हून अधिक पाहुणे उपस्थित राहतील अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून मिळत आहे.

बिमस्टेक समूहातील देशांचे राष्ट्राध्यक्ष

पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात बिमस्टेक समूहातील देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहतील. यात बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना, म्यानमारचे राष्ट्रपती यू विन

मिंट, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोटे तशरिंग, किर्गिस्तानचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोव, मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनॉथ तसेच थायलंडच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

क्रीडा क्षेत्रातून हे पाहुणे पाहणार उपस्थित

धावपटू पीटी ऊषा, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड, क्रिकेटपटू अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग, बँडमिंटनपटू सायना नेहवाल, पुलेला गोपीचंद, जिमनॅस्ट दीपा कर्माकर हे प्रसिद्ध खेळाडू या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील.

बॉलिवूडमधून हे पाहुणे राहणार उपस्थित

अभिनेता शाहरुख खान, दिगदर्शक करण जोहर, अभिनेत्री कंगना रणौत, साऊथचा सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता कमल हासन, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, विवेक ओबेरॉय यांच्यासह अन्य बॉलिवूड सेलिब्रिटी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात जाणार !

News Desk

राजकारणातील निवृत्तीपूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी !

News Desk

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

News Desk