नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीय गृह तथा अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सोमवारपर्यंत अटक करू शकत नाही, अशा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (२३ ऑगस्ट) झालेल्या सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे. या प्रकरणी चिदंबरम यांना काल (२२ ऑगस्ट) सीबीआय न्यायालयाने सोमवारपर्यंत (२६ ऑगस्ट) सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर या पाच दिवसाच्या कोठडीत चिदंबरम यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच वकिलांना चिदंबरम यांना दिवसातून ३० मिनिटे भेटण्याची परवानगी देण्यात आहे.
Both CBI and Enforcement Directorate matters to be heard again on Monday August 26 in Supreme Court. Chidambaram is in CBI custody till August 26. https://t.co/vVIwpsDPZc
— ANI (@ANI) August 23, 2019
या प्रकरणी ईडीने चिदंबरम यांना बुधवारी (२१ ऑगस्ट) लूकआऊट नोटीस जारी करण्यात आले होते. ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश दिले आहेत.
नमके काय आहे प्रकरण
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.