HW News Marathi
राजकारण

राफेल कराराच्या मुद्दयावरून राजकारण पेटले

नवी दिल्ली | काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या विरोधात लोकसभेत हक्कभंग प्रस्तावाची नोटीस देणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास ठरावाच्या दरम्यान भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर आरोप केले. भाजप काँग्रेस विरोधात हक्कभंगाची नोटीस देणार आहे.

राहुल गांधी यांनी अविश्वास प्रतवाच्या भाषणाच्या वेळीस राफेलच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर आरोप केले होते.राहुल गांधी यांनी ३६ राफेल विमानांच्या किंमतीवर प्रश्नचिन्हे उपस्थित केली होती. मोदी सरकारने रिलायन्स ग्रुपला फायदा करून दिला असल्याचा आरोप काँग्रेसने सभागृहात केला. मोदी आणि निर्मला यांनी राहुल यांच्या आरोपाचे खंडण देखील केले. या मुद्यावरून भाजप राहुल गांधी विरोधात तर, काँग्रेस मोदी आणि निर्मला सीतारमण यांच्या विरोधात लोकसभेत हक्कभंगाची नोटिस देणार आहे.

राफेल विमान खरेदी करार बाबत जाणून घ्या

भारत २००७ सालीपासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स म्हणजे राफेल विमान खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु काहीना काही अडचणींमुळे हा करार होण्यास अडथळे निर्माण होत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फान्स दौऱ्यानंतर राफेल विमान खरेदीला वेग आला. आणि फ्रान्सकडून मोदींनी भारतासाठी ३६ फायटर जेट्स खरेदी करण्याच्या घोषणा केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’वर शरद पवारांनी पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया…

Aprna

लालु प्रसाद यादव यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता नाही, आणखी एका प्रकरणात दोषी

News Desk

“महाविकास आघाडी सरकार OBC आरक्षणाबाबत गंभीर नव्हते,” देवेंद्र फडणवीसांची टीका

Aprna
देश / विदेश

अबब… चार वर्षात मोदींचे ऐवढे परदेश दौरे

swarit

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून पाच दिवसीय आफ्रिकेचा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात मोदी रवांडा, युगांडा आणि द. आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी सोमवारी सकाळी रवाना झाले आहेत. परदेशी दौऱ्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोदी हे रवांडा आणि युगांडा या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. मोदी चार वर्षात जवळपास पुर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत त्यांनी परदेशी दौरे केले आहेत.

मोदींनी गेल्या चार वर्षात ५४ देशांचे दौरे केले आहेत. आता यात रवांडा आणि युगांडा या दोन देशांचा समवेश होऊन ५६ असे परदेशी दौऱ्यांची संख्या झाली आहे. तर मोदींनी चार वर्षात १७१ दिवस विदेशात घालवले आहेत. मोदींच्या या परदेशी दौऱ्यांवर १४८४ कोटी रुपयांचा खर्च झाला. मोदींच्या २०१५च्या एप्रिल महिन्यातील फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा यादेशांतील दौऱ्यात सर्वात जास्त खर्च झाला सांगितले आहे.

मोदींना त्यांच्या ४ वर्षाच्या कार्यकाळात अमेरिकेला सर्वाधिक वेळा भेट दिली आहे. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या ९ वर्षाच्या कार्यकर्दीत परदेशी दौऱ्यावर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. मनमोहन सिंग यांच्या कार्यकालाच्या विदेश दौऱ्यांचा खर्चा निम्मापेक्षाही कमी आहे

Related posts

छत्रपतींची तुलना मोदीचं काय,कोणाशीचं होऊ शकत नाही..

Arati More

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा घट

News Desk

जेएनयू हल्ल्यात आइशी घोषसह ९ जण संशयित आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती

News Desk