HW News Marathi
राजकारण

शिवसेनेकडून अंबादास दानवेंनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी केला अर्ज दाखल

मुंबई | शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधान परिषदेच्या (Legislative Council) विरोधी पक्ष नेतेपदी  नियुक्ती होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर दानवेंनी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदी दावा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे पद जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये फुट फडणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करावी अशी शिफारस उपसभापतीकडे करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवेंची नियुक्ती करण्याची शिफारस केली. हा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचार करून घेतला असून जर संख्याबळ पण आमच्या बाजूने आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी समन्वय सुद्धा आहे. यामुळेच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सावंतांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना म्हणाले, “हे बेकायदेशी सरकारचे बेकायेदशीर मंत्रिमंडळ असून त्यांच्या मंत्रिमंडळाला काय उपमा देण्यात येणार नाही. महिलांवर अत्याचार आणि महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण राज्य सरकार जनतेला दिलासा देणारे कुठलेच पाऊल उचलत नाही. हे पूर्णपणे असंविधानिक मुख्यमंत्री आहे, असा टोला त्यांनी मारला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडले ‘वर्षा’ निवासस्थान

Aprna

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

News Desk