मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri East Assembly Bypoll) मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीला आज (6 नोव्हेंबर) सुरुवात झाल्यापासून शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांची विजयाची घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत नवव्या फेऱ्या झाल्या असून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत ऋतुजा लटके या मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत ऋतुजा लटकेंना 4277 मते, दुसऱ्य फेरीत 7817 मते, तिसऱ्या फेरीत 11361 मते, चौथ्या फेरीत 14648, पाचव्या फेरीत 17278, सहाव्या फेरीत 21090, सातव्या फेरीत 24955, आठव्या फेरीत 29033, नवव्या फेरीत 32515 आणि दहाव्या फेरी 37,469 मते मते मिळाली.
दरम्यान, या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. परंतु, या पोटनिवडणुकीत नोटालाही जास्त मते मिळाली आहे. तर ठाकरे गटाकडून मतमोजणीच्या दिवशी आरोप केला गेला होता. यासंदर्भात ठाकरे गटाने पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. यानंतर आज मतमोजणीमध्ये प्रत्येक फेरीत नोटाला देखील मते मिळाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या फेरीत नोटाला 622, दुसऱ्या फेरीत 1470, तिसऱ्या फेरीत 2967, चौथ्या फेरीत 3580, पाचव्या फेरीत 3859, सहाव्या फेरीत 4338, सातव्या फेरीत 4712, आठव्या फेरीत 5655, नवव्या फेरीत 6637 आणि दहव्या फेरीत 7556 मते मिळाली आहेत.
मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्तात
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे 3 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाले. या मतदानानंतर आज मतमोजणी होणार असून या मतमोजणीसाठी 200 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे 300 अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच 20 सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी सुरू
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.