HW News Marathi
राजकारण

हल्ले माझ्यावर नसून दिल्लीच्या जनतेवर, जनता याचा नक्की बदला घेणार !

नवी दिल्ली | आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (४ मे) दिल्लीमधील एका रोड शोदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने श्रीमुखात भडकावली होती. “गेल्या पाच वर्षापासून नऊ वेळा, आणि मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यापासून पाच वेळा माझ्यावर हल्ले झाले आहे. हे हल्ले माझ्यावर नसून दिल्लीच्या जनतेवर आहेत. दिल्लीची जनता या हल्ल्याचा नक्की बदला घेणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.”

तसेच केजरीवाल पुढे असे दखील म्हणाले की, “सुरक्षेत निष्काळजीपणावरून भाजप सरकारला जबाबदार धरत पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला आहे. हे हल्ले आपला संपविण्याचे कारस्थान असल्याचा आरोप केजरीवाल यांनी लावला आहे. देशाच्या इतिहासात अशा प्रकारचे हल्ले कोणत्याही मुख्यमंत्र्यांवर झाले नसतील.” अशा शब्दात केजरीवाल यांनी श्रीमुखात लवावल्यानंतर आज (५ मे) पत्रकार परिषेदत बोलताना सांगितले आहे.

केजरीवाल यांच्यावर झालेले हल्ले

आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काल (४मे )’रोड शो’दरम्यान सुरेशने जीपवर चढून त्यांच्या कानशीलात भडकावली होती. केजरीवाल यांच्यावर एप्रिल २०१६ मध्ये दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदेतच त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. हा व्यक्ती आम आदमी सेनेचा कार्यकर्ता वेदप्रकाश शर्मा होता. तसेच फेब्रुवारी २०१६ मध्ये लुधियानामध्ये केजरीवाल यांच्या कारवर काही लोकांनी लोखंडी रॉड आणि दांड्यांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये कारची काच फुटली होती. जानेवारी २०१६ मध्ये छत्रसाल स्टेडिअममध्ये महिलेने शाई फेकली होती. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. तसेच अन्य एका ठिकाणी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण…

Aprna

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

News Desk