नवी दिल्ली | मिझोरम विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण बहुमताने विजयी होऊन शनिवारी मिझो नॅशनल फ्रंटचे (एमएनएफ) अध्यक्ष जोरमथंगा यांनी मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकांच्या ४० जागांपैकी २६ जागांवर विजय मिळवत मिझो नॅशनल फ्रंट पक्ष एका दशकानंतर पुन्हा सत्तेत आला आहे.
Aizawl: Mizo National Front leader Zoramthanga takes oath as the Chief Minister of Mizoram. pic.twitter.com/nce5oo7ukE
— ANI (@ANI) December 15, 2018
मिझोरमचे राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) अधिकृतरीत्या मिझो नॅशनल फ्रंट पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनिर्वाचित आमदारांनी जोरमथंगा यांची राज्य विधिमंडळाचा नेता म्हणून निवड केली. त्या आधी जोरमथंगा यांनी असे स्पष्ट केले होते कि, ते भाजपचे आमदार बुद्धधन चकमा यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेणार नाहीत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.