नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड होणार हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठरवतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. भोपाळ येथे झालेल्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
Our best wishes to Shri @OfficeOfKNath for being elected CM of Madhya Pradesh. An era of change is upon MP with him at the helm. pic.twitter.com/iHJe43AB9v
— Congress (@INCIndia) December 13, 2018
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारल्यानंतर मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती. खरंतर, ज्योतिरादित्य सिंधिया हे राहुल गांधींचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये चर्चा रंगू लागल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली होती. कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे काँग्रेस आणि सोबत येणाऱ्या ७ आमदारांची मिळून, एकूण १२१ उमेदवारांची यादी सुपूर्द केली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी कमलनाथ यांची भेट घेतल्याने कमलनाथ यांचे नाव पुढे येत होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.