HW Marathi
राजकारण

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

बंगळुरु | कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हाय व्होल्टेज ड्रामाचा आज (१८ जुलै) शेवटचा अंक आहे. राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या नेतृत्वातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार विश्वासदर्शक ठरावाला सुरुवात झाली आहे. कर्नाटकातील १५ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार संकटात आले होते. कुमारस्वामींच्या सरकारकडे १०० पेक्षा कमी आमदारांचा पाठिंबा आहे. तर भाजपकडे १०५ आमदारांचा पाठबळ आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव त्यांच्याविरोधात जाईल अशी शंका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस येडियुरप्पा यांनी व्यक्त केली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने, कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर.रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तर बंडखोर आमदारांना सभागृहात हजर राहण्याचे कोणतेही बंधन नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाल्याने कुमारस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्यावर मुंबईत उपचार, विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिल आहेत. काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील काल (१७ जुलै) रात्री उशीरा मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. श्रीमंत पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलेय  कर्नाटकात आज नक्की कोणाचे सरकार येणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

 

Related posts

आरेतील वृक्षतोडीविरोधात सुमोटो याचिका, सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

News Desk

आंध्रची विधानसभा स्टॅच्यू ऑफ युनिटीला टक्कर देणार का?

News Desk

सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय, लाज कशी वाटतं नाही ?

News Desk