HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्री पदबाबत आज होणार सुनावणी

बंगळुरु | कर्नाटक विधानसभा निवडणुक झाली असली तरीही मुख्यमंत्री पदाचा पेच मात्र अद्याप सुटलेला नाही. राज्यात निवडणूक झाली असली तरीही कोणताही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे निकालानंतर सत्ता स्थापनेवरून राजकीय नाट्य रंगलेले पहायला मिळत आहे. मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडीयुरप्पा यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली परंतु या प्रकरणावर हरकत घेत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे या प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कोर्टाने शपथ विधीसाठी हरकत घेतली नव्हती परंतु आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र येडीयुरप्पा यांना आज न्यायालयात सादर करावे लागणार आहे. राजपालांनी अवधी दिला असला तरीही काँग्रेस च्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी येडीयुरप्पा राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी कोर्टासमोर ठेवतील. तसेच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनीही या शपथ विधीला स्वतंत्र आव्हान दिल्यामुळे तेही आपली बाजू खंडपीठा समोर मांडणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ भारत बंद’वेळी नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात

News Desk

आता सुटीच्या दिवशीही मिळणार लस! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्राच्या शिफारशीला मंजुरी

News Desk