HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या कैदेत

बंगळुरू | विधानसभेच्या सभागृहात काँग्रेसचे दोन आमदार गैरहजर असल्याची माहिती मिळाली होती. पण, हे आमदार गैरहजर नसून यांना येडियुरप्पांच्या मुलाने हॉटेलमध्ये कैद करुन ठेवले, असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आनंद सिह आणि प्रताप गौडा पाटील असे कैदेत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांचे नाव आहे. कैद केल्याची माहिती मिळताच पोलीस हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहे. तर काँग्रेसचे एकूण पाच आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दुपारी ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करायचे आहे. भाजप आज बहुमत कसे सिद्ध करणार याकडे सर्व देशांचे लक्ष लागले आहे. २२४ जागापैकी कर्नाटकात विधासभेच्या २२२ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. यात भाजप १०४, काँग्रेस ७८, जेडीएस ३८ आणि अन्य २ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस-भाजप यांना बहुमतासाठी ११२चा आकडा असणे गरजेचे आहे. भाजपला बहुमतासाठी ७ आमदारांची गरज आहे. दुसरीकडे काँग्रेस-जेडीएसला यांच्या आमदारांचे एकूण ११६ असे संख्या बळ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीत एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दुसरीकडे सरकारसोबत बैठका सुरुच

News Desk

भाजप सरकारच्या काळात नोक -यात ६० टक्क्यांनी घट

News Desk

तीन दिवस बँका सुट्टीवर

News Desk
शिक्षण

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

मुंबई | मंथन आर्ट फाउंडेशन, युवसेना आणि मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ऍडव्हर्टाइझ ऍण्ड आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर गायडन्स प्रदर्शन आणि सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे. मे महिना संपत आला आहे. १० वी , १२ वी च्या परीक्षा झाल्या असल्या तरी आता आयुष्यात काय करायचे हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा असतो. या प्रश्नाचे काहीस हटके उत्तर विद्यार्थ्यांना या सेमिनारमध्ये मिळणार आहे. डॉक्टर,अभियंता यापेक्षा ही अजून खूप क्षेत्राची दालने तुमची वाट पाहत आहेत. त्यातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्ह क्षेत्र.

या क्षेत्रातील परीपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना शेअर करण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २६ मे २०१८ ते २९ मे २०१८ या कालावधीत होणार असून कार्यशाळेचा प्रारंभ जाहिरात जगतातील महत्वपूर्ण नाव म्हणजेच भरत दाभोलकर आणि युवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळा रोज दुपारी २.०० ते ७.०० या वेळेत होणार आहे. यावेळी शशिकांत गवळी, कल्पेश गोसावी ,तुषार मोरे, वासुदेव कामत, दिलीप यंदे,मंगेश कांगणे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेमध्ये उपयोजित कलांचा करियर म्हणून कसा विचार कराल, युआय यु एक्स डिझाईन, फाईन आर्ट, कमर्शियल फोटोग्राफी, कॉपीरायटिंग या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. बारावी पास-नापास, ग्रॅज्युएट पण आजही भविष्यातील करिअरच्या निर्णयापर्यंत न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर सीईटी-यासारख्या एंट्रन्स परीक्षा प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कला शाखेतील वास्तव व जबाबदारीची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम असणार आहे.

वेळ आणि पैशांसोबतच विद्यार्थ्यांचा उत्साह कसा अबाधित राहील हे खूप महत्त्वाचे आहे. थोडक्यात काय तर लाईफ आणि करिअर हा काही आंधळी कोशिंबिरचा खेळ नाही तर तो आवड, कौशल्य आणि मार्केटची आवश्यकता म्हणजेच नोकरीची उपलब्धता यांचा सुरेख मेळ आहे. म्हणून या ऍडव्हर्टाइझिंग क्रिएटिव्ह करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे. मुलांवर काही लादण्याआधी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी. तसेच मंथन आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक प्रदर्शन पहावे असे आवाहन मंथन आर्ट फाउंडेशन यांच्याकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

Related posts

यशश्रीने गाठले यशशिखर

swarit

सत्तेत आल्यानंतर जावडेकरांना स्वतःच्याच आश्वासनांचा विसर | काँग्रेस प्रदेश शिक्षक सेल

News Desk

शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना वाढिव गुण देणार :  राज्य शिक्षण मंडळ  

News Desk