HW News Marathi
राजकारण

खडसे, दमानिया वाद पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातले राजकीय वितुष्ट कुणाला माहित नसेल तरचं नवल. सध्या पुन्हा एकदा दमानिया व खडसे यांच्यातला वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दमानियांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे दमानिया आणि खडसे यांच्यातील वाद वाढत जाणार असल्याची चिन्हे सध्या पहायला मिळत आहेत.

खरे मर्द असाल तर उच्च न्यायालयात माझ्याशी लढून दाखवा, असे आव्हान सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी खडसेंना दिले होते. खडसेंनी दाखल केलेल्या खटल्याबाबत पोलीस अटक करण्याआधीच त्या पोलिसांकडे पोहोचल्या होत्या. त्यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला होता.

दमानियांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही त्या पोलिसांना आव्हान देतात, तरीही गृहखाते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, यामुळेच त्यांचीही हिम्मत वाढत असावी, असेही खडसे म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंबरनाथ नगरपरिषदेकडे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणासाठी आवश्यक निधी मिळणार

Aprna

UP मध्ये मराठी भाषा शिकवा; भाजपच्या ‘या’ नेत्याने योगींना लिहिले पत्र

Aprna

शरद पवारांची मानसिकता राजेशाही, आम्ही मात्र जनतेचे सेवक !

News Desk
राजकारण

गुजरातमध्ये शिक्षणाचा व्यापार | हार्दिक पटेल

News Desk

मुंबई | पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर ट्विट करुन गुजरात मध्ये शिक्षणाचा व्यापार होत असल्याचे म्हटले आहे. शिक्षण घेण्याचा प्रत्येकाला हक्क असतानाही देशातील गरीब मुलांना शिक्षणाचा हक्क मिळत नाही.

https://twitter.com/HardikPatel_/status/1010117318620266497

यासाठी हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमधील उदगम शाळेच्या संस्थापकांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेव्हा पटेल यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली असताना त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. यावेळी पोलिसांनी पटेल यांना ताब्यात घेतले आहे.

Related posts

उद्या आम्ही सत्तेत आल्यास पालेकरांना आमच्यावरही टीका करण्याचा अधिकार !

News Desk

आठवलेंची आबा बागुल यांना ऑफर

swarit

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र !

News Desk