HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या प्रयत्नशील, शिवसेनेकडून मात्र टाळाटाळ ?

मुंबई | भाजप खासदार किरीट सोमय्या हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, दरम्यान, किरीट सोमय्या यांना अद्याप भेटीसाठी वेळ देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकांदरम्यान किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर, संतापलेल्या शिवसैनिकांनी या लोकसभा निवडणुकांमध्ये किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. युती झाली तरीही शिवसैनिक सोमय्या यांचा प्रचार करणार नाहीत, असे शिवसेना-भाजपची युती होण्याच्या बऱ्याच दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.

“किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत. तसेच एकही शिवसैनिक सोमय्यांना मत देणार नाही”, असे शिवसैनिकांकडून पक्षप्रमुखांना सांगण्यात आले होते. दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी किरीट सोमय्या यांना अद्याप उमेदवारी देण्यात आलेली नाही. काहीच दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा देखील झाली होती. मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही.

Related posts

मनसेकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देऊन सेना-भाजपला प्रेमाचा चिमटा

News Desk

उभ्या आयुष्यात इतका भित्रा, कमकुवत पंतप्रधान पाहिला नाही !

News Desk

महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर

News Desk