HW News Marathi
राजकारण

Bhima Koregaon : जाणून घ्या…भीमा-कोरेगावचे महत्त्व लोकांना कधी कळले ?

मुंबई | भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी रोजी विजय दिवसानिमित्ताने मोठा जनसागर लोटतो. १८१८ साली केलेल्या भीमा-कोरेगावच्या लढाईनंतर महार बटालियनने गाजवलेल्या शौर्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांकडून हा विजयस्तंभ उभारण्यात आला होता. मात्र, सामान्य लोकांमध्ये या स्तंभाबाबत आणि भीमा-कोरेगावच्या इतिहासाबाबत फारसे ज्ञान नव्हते. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम या भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट दिल्यानंतर या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी सामान्य लोकांची गर्दी वाढली.

इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्य यांच्यात १ जानेवारी १८१८ रोजी लढाई झाली होती. इंग्रजांच्या एकूण सैन्यामध्ये ५०० सैनिक महार बटालियनचे होते. त्या काळात दलितांना वाईट वागणूक दिली जात असल्याने या अन्यायाला विरोध म्हणून महार बटालियन या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झाल्यामुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला.

…त्यानंतर भीमा-कोरेगावला लोकांची गर्दी वाढली

भीमा-कोरेगाव इतिहासाचे महत्त्व सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. १ जानेवारी १९२७ रोजी या भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला भेट देऊन स्मृतिदिन साजरा केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भेटीनंतर दरवर्षी भीमा-कोरेगावच्या शौर्यदिनी म्हणजेच १ जानेवारीला असंख्य लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. या भीमा-कोरेगावच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शाहिद व ३ जखमी सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

बाबासाहेबांचा भिमा कोरेगाव येथील दुर्मिळ फोटो

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्राचाळ प्रकरणात नवीन ट्विस्ट; ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तत्कालीन कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

Aprna

OBC बांधवांच्या हक्कांचा व महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा विजय! – अजित पवार

Aprna

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk