HW News Marathi
व्हिडीओ

Bhima koregaon जाणून घ्या भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास

भिमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती.ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत त्यामुळे महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झाल्यामुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री नाही आले म्हणून देवीचं विसर्जनच केलं नाही; MNS संतप्त

News Desk

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | मला कळावं म्हणून फडणवीसांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत लिहीलायं…

Arati More

Amit Shah Resignation | दिशा कायदा महाराष्ट्रात येणार का ?

swarit