HW News Marathi
राजकारण

जाणून घ्या… आतापर्यंत गांधी घराण्याव्यतिरिक्त झालेले काँग्रेसचे अध्यक्ष

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल गांधी ४ पानाचे राजीनामा पत्र त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पोस्ट केले आहे. गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष म्हणून सुशील कुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहे. यानंतर स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसचे १८ अध्यक्ष झाले आहेत.

१८ पैकी ५ अध्यक्ष हे गांधी घराण्यातील होते. तसेच र्वाधिक काळ गांधी घराण्यातील व्यक्तीच काँग्रेसच्या अध्यक्षपदावर होत्या हा देखील इतिहास आहे. गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्तींनी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे तेव्हा पक्षाने निवडणुकीतही विजय मिळवला आहे.

गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष

  • १९४७ – हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर जेबी कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मेरठमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. महात्मा गांधी यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होत होता.
  • १९४८ ते ४९ – या दरम्यान काँग्रेसची कमान पट्टाभी सीतारमैय्या यांच्याकडे होती.
  • १९५० – पुरुषोत्तम दास टंडन यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं होती. नाशिक अधिवेशनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.
  • १९५५ ते ५९ – या काळात यूएन ढेबर यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद होते. यादरम्यान त्यांनी अमृतसर, इंदूर, गुवाहाटी आणि नागपूर अधिवेशनाची जबाबदारी सांभाळली. ढेबर यांच्यानंतर काही काळ इंदिरा गांधी अध्यक्ष होत्या.
  • १९६० ते ६३ – नीलम संजीव रेड्डी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी बंगळुरू, भावनगर आणि पाटना येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. यानंतर ते देशाचे सहावे राष्ट्रपदी झाले.
  • १९६४ ते १९६७ – हिंदुस्थानी राजकारणातील किंगमेकर बोलले जाणारे कामराज काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पंडीत नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादुर शास्त्री यांना पंतप्रधान बनवण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती असे बोलले जाते.
  • १९६८ ते १९६९ – एस निजलिंगप्पा यांनी याकाळात काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले.
  • १९७० ते ७१ – या काळात बाबू जगजीवन राम हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. याआधी 1946 मधील पंडीत नेहरुंच्या अंतरिम सरकारमधील ते सर्वात तरुण मंत्री होते.
  • १९७२ ते ७४ – शंकर दयाल शर्मा हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर शर्मा दुसरे अध्यक्ष होते जे नंतर राष्ट्रपती झाले.
  • १९७५ ते ७७ – देवकांत बरुआ यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. आणिबाणीचा हा काळ होता. ‘इंदिरा इज इंडिया’ आणि ‘इंडिया इज इंदिरा’ ही घोषणा त्यांनी दिला.
  • १९७७ ते ७८ – या काळात ब्रह्मनंद रेड्डी काँग्रेसचे अध्यक्ष बनले. यानंतर काँग्रेसचे विभाजन झाले आणि इंदिरा गांधी पुन्हा काँग्रेस(आय)च्या अध्यक्ष बनल्या.
  • १९९२ ते ९६ – राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी.व्ही. नरसिंमा राव हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
  • १९९६ ते ९८ – सीताराम केसरी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले.

१९९८ नंतर काँग्रेसने गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्ष पाहिलेला नाही. १९९८ ते २०१७ पर्यंत सोनिया गांधी या पदावर होत्या. त्यानंतर २०१७ ते २०१९ पर्यंत राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदा भूषविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

News Desk

जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात !

News Desk

राज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार ?

News Desk