HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजप नेत्याच्या घरातून १७ देशीबॉम्ब तर ११६ जिवंत काडतुसे जप्त

नवी दिल्ली | मध्य प्रदेशमधील भाजपचे नेते संजय यादव यांच्या घरातून मध्य प्रदेश पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. पोलीस अधिक्षक यांगचेन डी भूटिया यांच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून सोमवारी (१ एप्रिल) संजय यादव यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात संजय यादव यांच्या घरात पोलिसांना १३ पिस्तुल, १७ देशीबॉम्ब आणि ११६ जिवंत काडतुसे सापडली आहेत. पोलिसांकडून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

संजय यादव यांच्यासह त्यांचा सहकारी गोपाळ जोशी यांच्याविरोधात देखील अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी मध्य प्रदेशांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे दोघेही फरार आहेत. पोलिसांकडून यांचा शोध घेतला जात आहे. संजय यादव यांच्याविरोधात तब्बल ४७ तर गोपाळ जोशी ३० गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती देखील मिळत आहे. यांच्या दोघांच्याही नावावर खंडणी मागणे, मारहाण, हत्या, धमकी देणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

Related posts

विरोधकच्या एका हातात कटोरा, दुसऱ्या हातात खंजीर !

News Desk

श्री रामाला साकारणार शिल्पकार राम सुतार

News Desk

तेलंगणातील पहिली तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता

News Desk