नवी दिल्ली | देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’चे आज (२५ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या सर्व जवानांना आपल्या जीव गमविला त्यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली.
#WATCH Delhi: PM Narendra Modi,Defence Minister Nirmala Sitharaman and the three Service Chiefs at the #NationalWarMemorial pic.twitter.com/mb2Myw547Y
— ANI (@ANI) February 25, 2019
या वेळी “बोफोर्सपासून हेलीकॉप्टर घोटाळ्यापर्यंतची चौकशी एकाच कुटुंबाकडे असे बोलून गांधी घराण्यांवर टीकास्त्र सोडले. काही लोकांसाठी देश पहिला नाही, तर परिवार आणि परिवाराचे हित आहे,” असे सांगत मोदी म्हणाले आहे.
PM Modi at National War Memorial in Delhi: At this historical place, I pay my tribute to the brave soldiers who lost their lives in Pulwama and all those bravehearts who sacrifice themselves for protection of India pic.twitter.com/kM2YhciGxN
— ANI (@ANI) February 25, 2019
२००९ मध्ये १ लाख ८६ हजार बुलेटप्रूफ जॅकेटची भारतील लष्कराकडून मागणी केली जात होती. परंतु २००९ ते २०१४ याकाळातील तत्कालीन सरकारने एकही बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करण्यात आले नाही. मात्र, आमच्या सरकारच्या काळात गेल्या चार वर्षात सैनिकांसाठी २ लाख ३० हजार पेक्षा जास्त बुलेट प्रूफ जॅकेट्स खरेदी केली, असे बोलून मोदींनी काँग्रेसवर आरोप केले आहे.
PM Modi: Khud ko Bharat ka bhagyavidhata samjhne waale logon ne rashtra ke suraksha se khilwad karne mein koi kasar nahi chodi. In 2009, Forces demanded 1,86,000 bullet-proof jackets, but faced enemies without them. Our govt in 4.5 yrs bought over 2,30,000 bullet-proof jackets pic.twitter.com/OcqsexkpxB
— ANI (@ANI) February 25, 2019
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी मागणी केली जात होती. मात्र, आपल्या आशीर्वादामुळे 2014 मध्ये सुरू केलेले काम आज पूर्णत्वास गेले. सैनिकांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आणि शौर्यामुळे जागतिक पातळीवर ताकदवान देशांच्या यादीत भारताची गणना होत आहे. देशाच्या सैन्याला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून नियमित प्रयत्न केले जाणार आहेत. सैनिकांसाठी अत्याधुनिक शस्त्र खरेदीसाठी सुरुवात झाली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.