HW Marathi
राजकारण

मी तुम्हाला ‘चौकीदार’ची टोपी आणि शिटी देतो !

हैदराबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ” मै भी चौकीदार” ही मोहिम सध्या सोशल मीडियावर चर्चेला विषय ठरत आहे. या मोहिमे अंतर्गत नावाच्या आधी चौकीदार लावले जाते. या मोहिमेला लक्ष्य करत एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

अकबरुद्दीन ओवैसी असे म्हटले की,  “मी ट्वीटरवर पाहिले नरेंद्र मोदी चौकीदार झाले. मोदींनी त्यांच्या आधार आणि पासपोर्टवर देखील चौकीदार असे नमूद केले आहे का ?, खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मोदी हे कधी चहावाला तर कधी पोकोडेवाला बनतात. आता मोदी चौकीदार झाले असून मी तुम्हाला चौकीदारची टोपी आणि शिटी देतो. यामुळे तुम्ही डोक्यावर टोपी आणि गळ्यात शिटी घालून देशाचे रक्षण करावे.”

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ असे म्हणत थेट मोदींवर हल्ला चढवला होता. त्याविरोधात भाजपने ‘चौकीदार’ शब्दावर मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचे जोरदार प्रचार देखील सुरू आहे. ट्विटरवर या मोहिमेला सुरुवात झाली होती. यानंतर आता ही मोहिम फेसबुकवर देखील सुरू झाली आहे.

 

 

 

Related posts

भाजपला चढलेली सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी | सुप्रिया सुळे

Gauri Tilekar

भाजपला काँग्रेस मुक्त नाही, तर मुस्लिम-मुक्त भारत पाहिजे !

Shweta Khamkar

भाजप उमेदवारांची आज होणार घोषणा

News Desk