HW News Marathi
महाराष्ट्र

परळीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

परळी । बीडमधील परळी नगरपरिषदेते राष्ट्रवादी माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पांडुरंग गायकवाड असे या माजी नगरसेवक नाव आहे. गायकवाड यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. गायकवाड त्यांची पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत.निवडणुकीच्या रणधुमाळीत या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

गायकवाड हे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक होते. परळी ओव्हरब्रिजच्या खाली काल (२४ मार्च) रात्री त्यांच्यावर तलवारीला हल्ला करण्यात आला. या हल्लात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी प्रथमिक तपासातून पोलिसांनी ही शक्यता वर्तवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपा सरकारविरोधात मत व्यक्त केले तर कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का ? – अतुल लोंढे

Aprna

शिवरायांचे वंशज करणार मराठा मोर्चाचे नेतृत्व

News Desk

आज दिवसभर अशाच बातम्या येतील !

swarit