HW News Marathi
राजकारण

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

नवी दिल्ली | देशभरात आज (१८ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशभरातील १३ राज्यांमध्ये ९७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर बुलडाणा या १० मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. सकाळी ८ वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE

  • राज्यात सरासरी ४७ टक्के मतदान, दुपारी ३ वाजेपर्यंत बंपर मतदान, राज्यात सरासरी ४७ टक्के मतदान

    बुलडाणा ४५ टक्के, अकोला ४५ टक्के, अमरावती ४६ टक्के, हिंगोली ४९ टक्के, नांदेड ५० टक्के, परभणी ४८ टक्के, बीड ४६ टक्के, उस्मानाबाद ४६ टक्के, लातूर ४८ टक्के, सोलापूर ४१ टक्के

  • सीपीएमचे उमेदवार राईगानी मोहम्मद सालीम यांच्यावर इस्लापूर येथे हल्ला झाला असून हा हल्ल्यामागे टीएमसीने केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

  • कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या त्यांच्या मुलासोबत मतदान केले

  • जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत श्रीनगर आणि उधमपूर येथील मतदार संघात १७.८ टक्के मतदान झाले आहे.

  • बुलढाणा लोकसभा मतदार संघातील डोनगाव आणि मादणी या दोन ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या

    सुरू करण्याच्या गडबडीत निकालाचे बटन दबले आता मशीन बदलविण्यात आली आहे

  • बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५४ टक्के मतदान (जोर वाढतोय)
  • तामिळनाडूमध्ये ३०.६२ टक्के मतदान सकाळी ११ वाजेपर्यंत झाले आहे

  • बिहारमध्ये १८.९७ टक्के मतदान पार पडले आहे.

  • उत्तर प्रदेशमध्ये २४.३१ टक्के मतदान होणार आहे

  • सकाळी ११ वाजेपर्यंत आसाममध्ये २६ टक्के आणि छत्तीसगढमध्ये २६.२ टक्के मतदान झाले आहे

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • सोलापूरात शास्त्रीनगर येथील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने येथील मतदान प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे मतदारांना आवाहन

  • उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • छत्तीसगढमध्ये निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

  • सकाळी ९ वाजेपर्यंत सोलापूरमध्ये ५% मतदानाची नोंद
  • सकाळी ९ वाजेपर्यंत हिंगोलीमध्ये ५ % मतदानाची नोंद
  • अमरावतीत रवी राणा आणि नवनीत राणा यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • परभणीत ९ वाजेपर्यंत ५.३% मतदानाची नोंद
  • बिहारमध्ये ९० वर्षीय वृद्ध महिलांनी बजावला मतदानाचा हक्क

  • सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी केले मतदान
  • लातूरमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ८% मतदान
  • सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यांत झालेल्या मतदानाची टक्केवारी

डीएमके अध्यक्ष एम के स्टालिन यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • नांदेडच्या लेबर कॉलनीतील ३ बूथ अचानक बदलल्याने मतदारांची गैरसोय
  • नांदेडमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ७% मतदानाची नोंद
  • बीडमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ३.११ टक्के मतदान
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

  • सोलापूर उस्मानाबादसह अन्य ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड
  • मथुरेत ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा

  • प्रसिद्ध अभिनेते आणि बंगळुरू मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांनी केले मतदान

  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल नीधी मयम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन आणि मुलगी अभिनेत्री श्रुति हसन यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • किरण बेदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

    • साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले मतदान

  • माजी गृहमंत्री आणि सोलापूरमधील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी पत्नी उज्ज्वलाताई शिंदे, मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क

  • अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे मतदानास विलंब होण्याची शक्यता

  • आसाममधील सिलचर येथे व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक बिघाड

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाषण करून न दिल्यामुळे वसंत मोरे पुन्हा नाराज?

Aprna

मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे !

News Desk

राम मंदिरासाठी हिंदू संतांचा सरकारवर दबाव

swarit