HW News Marathi
राजकारण

पवारांविरोधात निवडणूक लढणार नाही, उदयनराजेंचे डोळे पाणावले

सातारा | सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती. यानंतर आज (२४ सप्टेंबर) निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतचे होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसने इथे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. उदयनराजे यांच्याविरोधात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज वृत्त वाहिन्यांशी संवाद साधला. त्यावेळी पवारांबद्दल बोलताना उदयनराजे डोळे पाणावले.

उदयनराजे म्हणाले, “शरद पवारांबद्दल कालही आदर होता. आजही आहे आणि उद्याही राहील. आज महान आहे तर पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस आहे. पवार हे मला वडिलधाऱ्यांच्याच स्थानी आहेत. ते निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही. अर्ज भरणार नाही. पण दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मला मुभा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार नसल्याचे स्पष्ट झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडेंनी महिलांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Aprna

विवेक ओबेरॉयवर महिला आयोग करणार कारवाई

News Desk

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk