HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : मला फक्त समुद्राची लाट माहित आहे !

पुणे | “मला फक्त समुद्राची लाट माहित आहे, बाकी लाटा मला माहित नाहीत”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. उदयनराजे पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची बैठक झाली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे २०१९ मध्येही मोदी लाट कायम राहणार का ? असा प्रश्न यावेळी उदयनराजे यांना एका पत्रकाराने विचारला होता.

“मला फक्त समुद्राची लाट माहित आहे, बाकी लाटा मला माहित नाहीत”, असे उत्तर उदयनराजे यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे, शिवेंद्रराजे आणि त्यांच्यातील वादाबद्दल बोलताना उदयनराजे म्हणाले कि, “शिवेंद्रराजे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. आमच्या दोघांमध्ये अनेक वाद असल्याचे गेले काही दिवस दाखविण्यात आले. मात्र आमच्यात कोणतेही वाद नसून कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाले होते. आता मात्र ते सर्व मागे सोडून आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत.”

Related posts

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

News Desk

पर्रीकरांचे पार्थिव ठेवल्याने कला अकादमीचे केले शुद्धीकरण, राज्यभरातून निषेध व्यक्त 

News Desk

भिडेंना अटक झाली नाहीतर विधान भवनाला घेराव घालू | प्रकाश आंबेडकर

अपर्णा गोतपागर