HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : बिहारच्या महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पटना | लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या यादीची घोषणा सुरुवात केली आहे. आता बिहारमध्ये देखील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून आज (२२ मार्च) महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली.  लालू प्रसाद यादव यांच्या पक्षला ४० पैकी २० जागा मिळाल्या आहेत.  काँग्रेस ९, हिंदुस्थानी आवाम मोर्चा ३, राष्ट्रीय लोक समता पार्टी ५, वीआईपी ३, सीपीआय १ जागांवर निवडणुका लढविणार आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केले आहे. आरजेडी प्रवक्ते मनोज झा यांनी पत्रकार परिषदेमध्ये जागावाटपाची माहिती दिली. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यादव यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले शरद यादव हे राजदच्या तिकिटावर लढणार आहेत. राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप व उमेदवारांची यादी जाहीर केली. हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी हे गयामधून निवडणूक लढवणार आहेत.

Related posts

देश सध्या अवघड परिस्थितीतून जात आहे | प्रणव मुखर्जी

News Desk

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

News Desk

तुमचा देखील ‘पानसरे-दाभोळकर’ करु, भूजबळांना धमकी

News Desk