HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : अशोक चव्हाण यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ ?

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी धुसफूस सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माझे कुणीही ऐकत नाही. म्हणूनच मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावासा वाटत आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटल्याची माहिती मिळत आहे, अशीही भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.

अशोक चव्हाण हे चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यास इच्छूक होते. मात्र काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असले म्हटले जाते कि चव्हाण यांच्या सांगण्यावरून धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला राम राम ठोकला होता. परंतु आपण त्यांनाच उमेदवारी देऊ शकलो नाही, याची अशोक चव्हाण यांना खंत असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला धक्का नाही

Aprna

चिक्की पाठोपाठ आता मोबाईल घोटाळा, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप

News Desk

बलात्कारी राज बल्लभ निर्दोष, शिक्षा हा यादवांचा अपमान, राबडी देवींचे अजब वक्तव्य

News Desk