HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने अखेर गुरुवार (२१ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात भाजप नेते जे पी नड्डा यांनी भाजपच्या या पहिल्या उमेदवार यादीत १८२ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसीतून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगरमधून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौ तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी नागपूरमधून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी भाजपच्या उमेदवार यादीची मोठी चर्चा होती. मात्र आज अखेर भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांना गाझियाबादमधून, महेश शर्मा यांना गौतमबुद्धनगरमधून, हेमा मालिनी यांना मथुरामधून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या या यादीत महाराष्ट्रातील एकूण १६ उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्चला आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशभरात ११ एप्रिलपासून एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहे.

आगामी लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी शनिवारी (१६ मार्च) रात्री तब्बल ८ तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक चालली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत रात्री २ वाजेपर्यंत ही बैठक चालली.

महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची नावे

उमेदवारांची नावे मतदारसंघ

डॉ.सुजय विखे पाटील अहमदनगर

नितीन गडकरी नागपूर

रानवसाहेब दानवे पाटील जालना

रक्षा खडसे रावेर

संजय पाटील सांगली

कपिल पाटील भिवंडी

हिना गावित नंदूरबार

सुभाष भांमरे धुळे

संजय धोत्रे अकोला

रामदास तडस वर्धा

अशोक नते गडचिरोली

हंसराज अहिर चंद्रपूर

गोपाल शेट्टी उत्तर मुंबई

पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई

प्रीतम मुंडे बीड

सुधाकरराव शिंगारे लातूर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार एकनाथ शिंदेंकडे 

News Desk

परळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे

News Desk

#LokSabhaElections2019 : खोतकरांची माघार, जालन्यातून दानवेंनाच मिळणार उमेदवारी ?

News Desk