नवी दिल्ली । केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. सत्ताधारी असलेला भाजप देखील आज (२० मार्च) लोकसभा निवडणुकांसाठीची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या पहिल्या यादीची चर्चा आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अन्य बड्या नेत्यांची नावे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी (१६ मार्च) रात्री तब्बल ८ तास चालली. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे अन्य नेत्यांच्या उपस्थितीत रात्री २ वाजेपर्यंत ही बैठक चालली. दरम्यान, अखेर आज भाजप आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करेल अशी माहिती मिळत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप २५ जागा लढविणार आहे. देशभरात ११ एप्रिलपासून ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, नितिन गडकरी, सदानंद गौडा, राधामोहन सिंह यांच्या नावांचा समावेश असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.