HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील (Andheri East by-election) आपला उमेदवार मागे घ्यावा. आणि भाजपने ही निवडणूक लढवू नये, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्र लिहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केले आहे. “राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार देखील करायचा असेल तर मल माझ्या सहकऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागले.” , अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपमध्ये मी एकटा निर्णय करून शकत नाही. राज ठाकरेंनी दिलेल्या पत्रावर आम्ही विचार देखील करायचाअसेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. आम्ही पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. याआधी अशा पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली. यावेळी आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतली होती.”

पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट 

“अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावर पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करणार नाही आणि पाठिंबाही देणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंनी आम्हाला उमेदवार देण्याची विनंती आशिष शेलारांनी केली. यानंतर राज ठाकरेंनी मला पत्र लिहून निवडणुकीत माघार घेण्याची विनंती केली,” असे म्हणाले.

 

संबंधित बातम्या

“भाजपने ही निवडणूक लढवू नये”, पत्र लिहून राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आवाहन

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

News Desk

मोदींच्या जाहीरसभेत भाजपच्या एका मंत्र्यांकडून महिला मंत्र्यांचा विनयभंग

News Desk

जाधवांची भेट घेणे ठाकरेंनी नाकारले

News Desk