HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची पाचवी उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता देशातील राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने सोमवारी (१८ मार्च) रात्री आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या पाचव्या उमेदवार यादीत आंध्र प्रदेशमधील २२, तेलंगाणामधील ८, आसाममधील ५, ओडिशामधील ६, उत्तर प्रदेशमधील ३, पश्चिम बंगालमधील ११, आणि लक्षद्वीपमधील १ अशा एकूण ५६ उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांना जंगीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून ओडिसा विधानसभा निवडणुकांसाठी देखील उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३६ उमेदवारांचा समावेश आहे.

Related posts

मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे ?

News Desk

राज्य छत्रपती, आंबेडकरांचे, गहाण कोण ठेवतंय | ठाकरे

अपर्णा गोतपागर

#LokSabhaElections2019 : मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

News Desk