HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंना धक्का बुकी

औरंगाबाद | मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काकासाहेब शिंदे यांना यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे काकासाहेब शिंदे यांच्यावरील अंत्यविधी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मराठा बांधव बहुसंख्याने उपस्थित होते. यावेळी मराठा बांधवांच्या मनातील रोषला चंद्रकांत खैरे यांना सामोरे जावे लागले. खैरै यांना बांधवांनी धक्का बुकी करून हाकलून लावले.

कोणत्याही लोकप्रतिनिधीने इथे येऊ नये, असे म्हणत मराठा मोर्चा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठा बांधवांचा आक्रमक पवित्रा पाहून चंद्रकांत खैरे यांनी काढता पाय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीविषयी केलेल्या विधानाबाबत पित्रोदा यांनी माफी मागावी !

News Desk

ठाकरे चित्रपट ‘बेस्ट’, गाणी ‘बेस्ट’ म्हणत संजय राऊत यांची मुख्य प्रश्नाला बगल

News Desk

#LokSabhaElections2019 : राजू शेट्टी आघाडीसोबत राहणार

News Desk