HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : निवडणूक लढविण्याबाबत सलमानचा मोठा खुलासा

मुंबई | अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. “मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही, आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार देखील करणार नसल्याचे स्पष्टीकरण सलमानने ट्विट करत दिले आहे.”

काँग्रेसच्या इंदूरमधून सलमान निवडणूक लढविणार असून सलमानच्या विरोधात अध्यक्षा सुमित्रा महाजन असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु सलमाच्या ट्विटनंतर या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. तसेच आज (२१ मार्च) सकाळीच सलमान खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट रिट्वीट करत जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर सलमान खान निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. त्यामुळे सलमानने पुन्हा एकदा ट्वीट करत खुलासा केला आहे. गेल्या आठ इंदूरची सीट भाजपकडे असून ही सीट काँग्रेसकडे खेचून घेण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचे नाव सुचवले होते.

 

Related posts

कर्नाटक निवडणुक, दुपारपर्यंत ५६ टक्के मतदान

News Desk

‘ते’ १५ लाख लोकांच्या खात्यात हळूहळू जमा होतील !

News Desk

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk