HW News Marathi
राजकारण

कार्यकर्त्यांनी एक्झिट पोल, अफवांमुळे घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही !

नवी दिल्ली | काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी खास आपल्या कार्यकर्त्यांसाठी ऑडिओ क्लिपद्वारे एक संदेश जारी केला आहे. “कार्यकर्त्यांनी एक्झिट पोल आणि अफवांमुळे घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. अशा अफवा पसरवून कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच या प्रकरणी सावध राहणे महत्त्वाचे ठरते. कार्यकर्त्यांनी न घाबरता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहावे”, असा संदेश प्रियंका गांधी यांनी एका ऑडिओमार्फत जारी केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पार पडताच विविध वृत्तवाहिन्यांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे आवाहन केले आहे.

“कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे एक्झिट पोल आणि अफवांमुळे कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. कार्यकर्त्यांनी न घाबरता स्ट्रॉंगरूम आणि मतमोजणी केंद्राबाहेर खंभीरपणे उभे राहावे”, असा संदेश प्रियांका गांधी यांनी दिला आहे. विविध एक्झिट पोलनुसार, केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कायम राखण्यासाठी प्रियांका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी अपक्ष लढणार नाही, कालिदास कोलंबकरांचे पक्षबदलाचे संकेत

News Desk

#MarathaReservation : मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस, १६ टक्के आरक्षण जाहीर

News Desk

मानहानी प्रकरण: राहुल गांधी शिक्षेविरोधात सूरत न्यायालयात याचिका दाखल करणार

Aprna