HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : …कोल्हेला पडणार, विलास लांडेंच्या समर्थकांची पोस्टरबाजी

पुणे | ‘राजा शिवछत्रपती’ तसेच ‘छत्रपती संभाजी’ या मालिकांमुळे प्रकाशझोतात आलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी १ मार्चला शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. शुक्रवारी (१५ मार्च) जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवार यादीनुसार अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघांची उमेदवारी देण्यात आल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादीकडून शिरूरमधील उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. मात्र, अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्याने विलास लांडे यांच्या संतप्त समर्थकांनी अमोल कोल्हेंविरोधात पोस्टरबाजी केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

“अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार…आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार…लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली, पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार, कोल्हेला पडणार”, असा मजकूर असलेले पोस्टर्स लावत विलास लांडे यांच्या समर्थकांनी अमोल कोल्हे यांना इशारा दिला आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या पक्षप्रवेशानंतरच विलास लांडे आणि त्यांच्यातील वाद दिसून आले.

निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवायचा, हा निर्णय पक्षांतर्गत घेतला जातो. शिरुर लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने थेट जनतेकडूनच उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबण्यात आला. ७ मार्चला मंचरमध्ये पार पडलेल्या या जाहीर संवाद यात्रेत अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांसाठी थेट मतदानच घेतले होते. या जाहीर मतदानात खासदारकीच्या उमेदवारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंना भरघोस प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या सभेतही विलास लांडे यांच्या समर्थकांनी तिकीट मिळण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही ?

News Desk

सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे !

News Desk

राज ठाकरे, महादेव जानकर यांच्या भेटी मागचे कारण काय ?

News Desk