HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, २१ उमेदवारांच्या नावांचा समावेश

मुंबई | बहुप्रतीक्षित अशी शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची आज (२२ मार्च) पहिली यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या या यादीत २१ उमेदवारी घोषणा केली आहे. यात दक्षिण मुंबईतून अरविंत सावंत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने सातारा मतदार संघतून अजून अद्याप उमेवारांची घोषणा केली नाही. उस्मानाबादमधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्या पत्ता कट झाला असून त्यांच्या जागी सेनेचे ओमप्रकाश राजे निंबालकर यांना उमेदवारी जाहीर देण्यात आली आहे.

सत्ताधारी भाजपने १८४ उमेदवारांची पहिली यादी काल (२१ मार्च) जाहीर केली होती. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्य यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावांची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधून उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगर या त्यांच्या  इच्छित मतदारसंघातून  उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून अहमदनगरमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या सुजय विखे पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला होता.

भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगरमधून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौ तर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांना गाझियाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महेश शर्मा यांना गौतमबुद्ध नगर मधून उमेदवारी मिळाली आहे. मथरामधून हेमा मालिनी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांची नावे

 • मावळ – श्रीरंग बारणे
 • दक्षिण मुंबई – अरविंत सावंत
 • औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
 • ठाणे – राजन विचारे
 • कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे
 • परभणी – संजय जाधव
 • अमरावती – आनंद अडसूळ
 • उत्तर पश्चिम मुंबई – गजानन कीर्तीकर
 • बुलढाणा – प्रतापराव जाधव
 • रायगड – आनंद गिते
 • रामटेक – कृपाल तुमाने
 • हिंगोल – हेंमत पाटील
 • उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
 • नाशिक – हेंमत गोडसे
 • शिरूर – अढळराव पाटील
 • शिर्डी – सदाशिव लोखंडे
 • दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
 • यवतमाळ – भावना गवळी
 • रत्नागिरी -सिंधुदूर्ग – विनायक राऊत
 • कोल्हापूर – संजय मंडलिक

 

 

 

 

Related posts

फक्त राज्यमंत्री पद देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली !

News Desk

मराठवाड्याच्या सामनाचे रौप्य मोहत्सवी वर्ष

News Desk

२ वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार

News Desk