नवी दिल्ली । सत्ताधारी भाजपने आज (२१ मार्च) पहिल्या उमेदवार यादीला जाहीर झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची यादीची घोषणा केली आहे. संध्याकाळी ७ वाजता दिल्लीतल्या मुख्यालयात भाजपची पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे.
Union Minister Nitin Gadkari: Party has expressed its faith in me, I will win with an even better margin this time. People of Nagpur supported me last time as well. They are happy with our work, we will do even better after getting elected again. pic.twitter.com/EsioDWfZoq
— ANI (@ANI) March 21, 2019
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना देखील भाजपने त्यांच्या इच्छित मतदारसंघातून म्हणजेच अहमदनगरमधून उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधून उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून अहमदनगरमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या सुजय विखे पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला होता.
महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची नावे
उमेदवारांची नावे मतदारसंघ
डॉ.सुजय विखे पाटील अहमदनगर
नितीन गडकरी नागपूर
रानवसाहेब दानवे पाटील जालना
रक्षा खडसे रावेर
संजय पाटील सांगली
कपिल पाटील भिवंडी
हिना गावित नंदूरबार
सुभाष भांमरे धुळे
संजय धोत्रे अकोला
रामदास तडस वर्धा
अशोक नते गडचिरोली
हंसराज अहिर चंद्रपूर
गोपाल शेट्टी उत्तर मुंबई
पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई
प्रीतम मुंडे बीड
सुधाकरराव शिंगारे लातूर
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.