HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : ‘बेरोजगार हार्दिक पटेल’, भाजपच्या प्रचार मोहिमेची उडविली खिल्ली

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय पक्षांचे प्रचार रंगू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्चला लोकसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर केल्यानंतर राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपने देखील यंदाच्या निवडणुकांमध्ये अनोख्या प्रचारतंत्राचा वापर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अन्य सर्वच नेत्यांनी त्याचा अधिकृत ट्विटर हँड्लच्या नावाआधी ‘चौकीदार’ असे लिहिले आहे. दरम्यान, या प्रचार मोहिमेमुळे भाजप आणि पंतप्रधान मोदी वारंवार टीकेचे धनी होत आहेत. आता पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी ‘बेरोजगार’ असा शब्द जोडून भाजपच्या मोहिमेची खिल्ली उडविली आहे.

“मी देशाचा पंतप्रधान नव्हे तर चौकीदार आहे”, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य चांगलेच गाजले. त्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच वाक्यावरून त्यांची फिरकी घेत “चौकीदार चोर है” च्या घोषणा दिल्या. मात्र, आता पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून ‘मैं भी चौकीदार’ ही प्रचारमोहीम राबविण्यात येत आहे. ट्विटरवर सध्या पंतप्रधान मोदींसह भाजपच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवर स्वतःच्या नावांआधी “चौकीदार” असा उल्लेख केला. दरम्यान, भाजपच्या या प्रचार मोहिमेवर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे.

‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या प्रचारासाठीचा भाजपचा पहिला व्हिडीओ

“देशाचा चौकीदार खंभीरपणे उभा आहे, देशाची सेवा करतो आहे. परंतु, मी एकटा नाही. भ्रष्टाचाराविरोधात, समाजातील गुन्हेगारीविरोधात जो उभा आहे तो प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. भारताच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. आज प्रत्येक भारतीय बोलत आहे “मैं भी चौकीदार”, अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ मार्चला आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

ज्यांची भांडणे ही विनोदी वाटतात, ते युध्दाची भाषा करत, भागवंतांच्या वक्तव्याची- धनंजय मुंडे ची खिल्ली

swarit

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधींचे मराठीतून ट्विट

News Desk