HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : मी सल्ला नव्हे तर पाठिंबा दिला होता !

नवी दिल्ली | “पुलवामा हल्ल्यानंतर केंद्राने दिल्लीत तातडीने बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत भारतीय लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. त्यावेळी, या ठरवलं मी देखील पाठिंबा दिला होता. मी त्या बैठकीत सल्ला नव्हे तर केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास सर्व पक्षप्रमुखांसह मी देखील पाठिंबा दिला होता. मात्र, माझ्या याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे.

शरद पवार यांची फेसबुक पोस्ट

“जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय लष्कराच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. यात माझाही सहभाग होता. मात्र, मावळ मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मीच दिला, असे मी म्हणालो असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. परंतु, तसे नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी त्या बैठकीत सल्ला नव्हे तर केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास सर्व पक्षप्रमुखांसह मी देखील पाठिंबा दिला “, असे त्यांनी या पोस्ट मध्ये स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासनाने भारतीय लष्कराला संपूर्ण अधिकार देऊन दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याचे आदेश द्यावेत असा सल्ला मीच दिला होता”, असे वक्तव्य शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते. मात्र, आता शरद पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकारी माझे ऐकत नाहीत, गिरीश महाजन यांची तक्रार

News Desk

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

News Desk

एखाद्याने पंतप्रधान मोदींवरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल !

News Desk