HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

मुंबई | भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तरी आपण लढण्यास तयार असल्याचे अखेर माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. अद्याप, विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच आहेत. मात्र, जर भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली तर विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीला राम राम करण्याची शक्यता वाढली आहे. काहीच दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विजयसिंह हे देखील मनाने भाजपमध्येच आहेत’ असे सूचक वक्तव्य केले होते.

पहिल्यांदा माढा मतदारसंघासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र, ते राज्यात राहण्यास इच्छुक असल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून माढ्याची उमेदवारी त्यांनाच मिळणार असे जवळपास निश्चित होते. मात्र, आता त्यांचेही नाव मागे पडले असून माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव पुढे येत आहे. भाजपने तिकीट दिल्यास माढ्यातून उभे राहणार का ? का असा सवाल माध्यमांनी विजयसिंह यांना विचारला असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.

Related posts

रायगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवीशेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

कॉंग्रेसने कधीही भगवा दहशतवाद असे म्हटले नाही | पीएल पुनिया

News Desk

कर्नाटकाच्या आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk