HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची अधिकृत माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ७ फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास मनसे इच्छुक नसल्याचे शरद पवार यांना सांगितल्याची माहिती मिळत होती. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे विधानसभा निवडणुका लढविण्यास इच्छुक असून लोकसभा निवडणूक लढविण्यास आम्हाला काही रस नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती मिळत होती. दरम्यान, आता मनसेकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

राजनाथ सिंग म्हणतात, ‘संयम राखा’ तर गडकरी सांगतात, ‘सहमतीने मंदिर बांधा’

News Desk

#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार

News Desk

बिग बॉस फेम शिल्पा शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk