HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : मोदी साहेब, २०१४ सालच्या ट्रिक्स आता कामी येणार नाहीत !

मुंबई | “२०१४ साली वापरलेल्या ट्रिक्स आता कामी येणार नाहीत मोदी साहेब. शेतकऱ्यांसाठीची तुमची कर्जमाफी फसवी, दुप्पट हमीभावातही खोटी, बेरोजगाराचे गड आम्ही चढले, महागाईची झळ सोसली, १५ लाखांची स्वप्ने धुळीत माखली. त्यानंतर आमचे मत पक्क आहे. आप भी चोर चौकीदार, पाप मे भागीदार !”, असे जहरी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपकडून “मैं भी चौकीदार हूं” मोहीम राबविण्यात येत आहे. भाजपच्या सर्व नेत्यांच्या ट्विटर अकाऊंट्सची नाव बदलून आता त्यांच्या स्वतःच्या नावाआधी ‘चौकीदार’ असे उल्लेख करण्यात आला आहे. आता विरोधी पक्षांकडून यावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

“मी देशाचा पंतप्रधान नव्हे तर चौकीदार आहे”, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य चांगलेच गाजले. त्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच वाक्यावरून त्यांची फिरकी घेत “चौकीदार चोर है” च्या घोषणा दिल्या. मात्र, आता पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून एक वेगळेच प्रचारतंत्र राबविण्यात येत आहेत. दरम्यान, भाजपच्या या मोहिमेवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसची स्तुती, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला

Gauri Tilekar

जाणून घ्या…’भारत जोडो यात्रे’ने महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ?

Aprna

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे

News Desk