HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : आता तुम्हीही शिवसेनेत येऊन युती मजबूत करा !

मुंबई | “सुजयने भाजपमध्ये प्रवेश केला, आता तुम्हीही शिवसेनेत येऊन युती मजबूत करा”, अशी ऑफर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी आज (१२ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या निवड समितीकडे नगर लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता लगेचच शिवसेनेने राधाकृष्ण विखे पाटील यांनाच शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

भाजप प्रवेशादरम्यान सुजय यांनी म्हटले की, “मला वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागला. संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली मी त्यांच्यासोबत राहणार असून मी अहमदनगरमध्ये पक्षाच्या वाढीसाठी काम करणार आहे”. त्याचप्रमाणे “आमच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या घोषणा देण्यात सवय होण्यास थोडा वेळ लागेल”, असेही सुजय यांनी यावेळी म्हटले आहे. सुजय विखे-पाटील यांच्या या पक्ष प्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून सुजय यांच्या पक्ष प्रवेशावरून राजकारण सुरू होते. परंतु आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने संपूर्ण चर्चेला पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (१२ मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीच्या जागेवर आमचा उमेदवार लढणार आहे. यानंतर सुजय यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कमोर्तब झाला होता. आता राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील शिवसेनेने ऑफर दिली आहे. परंतु राधाकृष्ण विखे पाटील आता नेमके काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

मुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असूरक्षित – जयंत पाटील 

Ramdas Pandewad

येत्या काळात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल !

News Desk

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk