HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : पवारांची विधाने दुर्दैवी, मी माझ्या मुलाविरोधात प्रचार करणार नाही !

विशाल पाटील | सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विधीमंडळ विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत काॅंग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो आहे. आज (१४ मार्च) राधाकृष्ण विखे पाटील याबाबत पत्रकार परिषद देऊन स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या मुलासाठी संघर्ष होतोय या चुकीच्या चर्चा आहेत. आघाडी झाली म्हणूनच जागा वाटपाबाबत चर्चा होत होत्या काॅंग्रेस पक्ष म्हणून आम्ही काही जागा मागितल्या , जागांची आदला बदली बाबत चर्चा झाली मात्र यातून तोडगा निघाला नाही. नगर मध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झालेली आहे म्हणून या जागेची मागणी आम्ही केली, खूप चर्चा झाल्या मात्र तोडगा निघाला नाही योग्य समन्वय करण्यासाठी खूप प्रयत्न केले. भाजपमध्ये जाण्याच्या बाबतीत सुजयने माझ्याबरोबर काही चर्चा केली नाही. मी माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार करणार नाही तसेच मी अहमदनगर मध्ये प्रचाराला जाणार नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी केलेली विधाने दुर्देवी

गेले काही दिवस राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सात्यताने विखेंवर टीका केली. यामध्ये त्यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता याची आठवण ही करून दीली होती. आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी माझ्या वडीलांच्या बाबतीत केलेलं विधान हे अत्यंत चुकीचे आहे मला याबबत खुप दुःख झाले.हयात नसताना केलेली टीका शरद पवारांनी दुर्देवी हे त्यांना शोभणारे नाही.शरद पवार यांच्या टिकेमुळे सुजय ने हा निर्णय घेतला असावा असंही विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून सुजय विखे पाटील पवारांच्या विधानामुळे भाजपात प्रवेश गेला याला कारणीभूत पवार असल्याचे सुचक वक्तव्य केले. आघाडी धर्माला काही गालबोट लागेल असे मी वागलो नाही, शरद पवार यांनी दोनदा ही विधाने केली. मला याचे दुःख झालेले आहे, अशी नाराजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

मी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही | राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मला पक्षाकडून स्पष्टीकरणाबाबत विचारले नाही. पक्ष जी भूमिका देईल ती मी पार पाडेन. राजीनामा बाबतीत काहीही चर्चा झालेली नाही. मी राजीनामा देणार नाही” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर उमेदवार निवडून आणणारा !

News Desk

UP मध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला; योगी आदित्यनाथांचा निर्णय

Aprna

“…जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे”, बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Aprna