HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : पंतप्रधान मोदींनी जाहिरातींवर तब्बल ३०४४ कोटींचा खर्च केला !

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्या दृष्टीने देशातील सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीका सुरु आहे. “भाजपला सामान्य लोकांच्या हितापेक्षा जाहिराती अधिक महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहिरातींवर तब्बल ३०४४ कोटींचा खर्च केला आहे”, असा दावा बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी केला आहे.

“पंतप्रधान मोदींनी जाहिरातींवर केलेल्या खर्चात उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील प्रत्येक खेड्यात शिक्षण, आरोग्यविषयक अनेक सोयी होऊ शकल्या असत्या”, असेही मायावती यावेळी म्हणाल्या. मायावतींनी ट्विट करून भाजपच्या जाहिरात खर्चावर टीका केली आहे. भाजपवर कायमच जाहिरात खर्चावरून टीका करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मीटू’ मोहिमेच्या तक्रारीनंतर लवकरच कायदेतज्ज्ञाची समिती

swarit

‘भाईयो और बहनो’, म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधानांची नक्कल

Darrell Miranda

शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार

News Desk