HW Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : भाजपच्या पहिल्या यादीत मोदींसह अन्य बड्या नेत्यांच्या नावांची शक्यता

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी (१० मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांची लगबग सुरु झाली आहे. देशातील राजकीय पक्षांकडून आता आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान, लवकरच भाजप देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपकडून उद्या (१६ मार्च) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे या यादीत पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अन्य बड्या नेत्यांची नाव असू शकतात अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

देशभरात ११ एप्रिलपासून ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदीसह राजनाथ सिंह, नितिन गडकरी, सदानंद गौडा, राधामोहन सिंह यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शनिवारी संध्यकाळी भाजपची एक बैठक पार पडेल. या बैठकीनंतर भाजपकडून १०० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related posts

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

मुख्यमंत्री जलयुक्तवरील खर्च झालेल्या साडेसात हजार कोटींचा हिशोब द्या | धनंजय मुंडे

News Desk